There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
नाती समजून घ्या, भावना ओळखा, संवाद अधिक सुंदर करा!
मानसशास्त्राच्या मदतीने स्वतःला आणि आपल्या माणसांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्या.
Instructor: Dr. Rajendra BarveLanguage: Marathi
नातेसंबंध आणि भावनांचे मानसशास्त्र सर्टिफिकेट कोर्स
आपल्या माणसांना आपण आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो का? कधी आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, पण ते नीट सांगता येत नाही. कधी आपण मनापासून बोलतो, तरी समोरच्या व्यक्तीला आपल्याला काय म्हणायचंय हे समजत नाही. आणि कधी समोरची व्यक्ती असं का वागतेय, हेच कळत नाही.असं का होतं? आपल्या भावना आणि अपेक्षा आपल्या नात्यांवर कसा परिणाम करतात? या गोष्टी मानसशास्त्राच्या मदतीने समजून घेऊया. डॉ. राजेंद्र बर्वे सरांच्या मार्गदर्शनाखाली, सोप्या मराठीत!
ओळखीचं वाटतंय?
हे अनुभव तुमच्याही बाबतीत घडतात का?
“मी एवढं समजावून सांगतो, तरी समोरच्या व्यक्तीला समजत कसं नाही?”
“प्रत्येक वेळी मलाच समजून घ्यावं लागतं!”
“बोलायला गेलं की वाद होतो. मग गप्प बसलेलं बरं!”
“नातं तेच आहे, पण आधीसारखी जवळीक राहिली नाहीये…”
असे विचार कधी तुमच्याही मनात येतात का? नात्यात दोघांनाही एकमेकांची काळजी असते. तरीही गैरसमज होतात, अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि छोट्या गोष्टींचं मोठं रूप होतं. अनेकदा प्रश्न कोण बरोबर आणि कोण चूक हा नसतो. आपण काय अनुभवतो, त्या अनुभवाचा काय अर्थ लावतो आणि त्यावर कशी प्रतिक्रिया देतो, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.
या कोर्समधून काय मिळेल?
तुमचे प्रशिक्षक
डॉ. राजेंद्र बर्वे
मानसोपचारतज्ज्ञ | MD, DPM, FIPS
मानसोपचार क्षेत्रातील ४० वर्षांहून अधिक अनुभव
डॉ. राजेंद्र बर्वे सर गेली अनेक वर्षं मानसोपचार आणि मानसशास्त्राच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मानसशास्त्रातील विविध विषयांवर त्यांची ४७ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. श्रीलंकेत माइंडफुलनेस साधना केल्यानंतर त्यांना “सुगत आचार्य” ही पदवी प्राप्त झाली आहे. मानसशास्त्रातील संकल्पना केवळ समजून घेणं नव्हे, तर त्या आपल्या रोजच्या आयुष्यात कशा दिसतात, हे जाणून घेण्याची संधी या कोर्समधून मिळेल. डॉ. बर्वे सरांच्या मार्गदर्शनाखाली नातेसंबंध आणि भावनांकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायला शिका.
प्रमाणपत्र
कोर्स पूर्ण करा आणि मिळवा प्रमाणपत्र
अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सहभागींसाठी संवेदन मानसशास्त्र अभ्यास केंद्रातर्फे Skill India मान्यताप्राप्त प्रमाणपत्राची तरतूद आहे.
✓ Skill India मान्यताप्राप्त प्रमाणपत्र
✓ नोंदणी क्रमांक: TP164015
✓ डॉ. राजेंद्र बर्वे सरांच्या मार्गदर्शनाखालील कोर्स
✓ महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब पार्टनर उपक्रम
२२ ऑक्टोबरपासून, दर गुरुवारी
संध्याकाळी ७ ते ९
संपूर्ण २ महिने · लाइव्ह + रेकॉर्डेड सेशन्स
✓ दर गुरुवारी २ तासांचं ऑनलाइन लाइव्ह सेशन
✓ स्वतंत्र ट्रेनिंग अॅपवर ३ महिने रेकॉर्डिंग पाहण्याची सुविधा
✓ गटचर्चा आणि चॅट बॉक्सद्वारे आपलं मत मांडण्याची संधी
✓ EFT आधारित प्रॅक्टिकल टूल्स आणि रोल-प्ले
✓ भावनिक वर्कशीट्सच्या मदतीने सराव
✓ डॉ. राजेंद्र बर्वे सरांचं मार्गदर्शन
✓ Skill India मान्यताप्राप्त प्रमाणपत्र
बॅचमधील जागा मर्यादित · प्रश्नांसाठी कॉल करा:
9975769371 / 8767590355
Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.
Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.
Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.
Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat groups.
With the quizzes and live tests practice what you learned, and track your class performance.
Flaunt your skills with course certificates. You can showcase the certificates on LinkedIn with a click.