There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
कंटेंट क्रिएशन शिका आणि डिजिटल जगात स्वतःची ओळख निर्माण करा.
Instructor: Sayali Randive-Joshi / Prasad JoshiLanguage: Marathi
"कंटेंट क्रिएशन म्हणजे फक्त व्हिडिओ बनवणं? की लोकांच्या मनात जागा निर्माण करण्याची कला?"
आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे… प्रत्येकाकडे सोशल मीडिया आहे… पण प्रत्येकजण कंटेंट क्रिएटर होत नाही. अनेकांना वाटतं, "माझ्याकडे महागडा कॅमेरा नाही… चांगलं इंग्रजी बोलता येत नाही… माझं आयुष्य एवढं खास नाही… मग मी कंटेंट कसा तयार करणार?"
पण थोडा विचार करून पाहा…
दिवसभरात आपण किती रील्स, शॉर्ट्स आणि व्हिडिओ पाहतो? काही सेकंदांत अनेक व्हिडिओ स्क्रोल करून पुढे जातो, पण काही व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहतो… सेव्ह करतो… मित्रांना शेअर करतो… आणि त्या व्यक्तीला फॉलोही करतो.
असं का होतं?
कारण प्रभावी कंटेंट तयार करण्यासाठी केवळ चांगला कॅमेरा, महागडं स्टुडिओ किंवा मोठी टीम पुरेशी नसते. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं—आपल्या प्रेक्षकांना समजून घेणं. त्यांना काय पाहायचं आहे? त्यांचं लक्ष कशाकडे वेधलं जातं? कोणती गोष्ट त्यांना विचार करायला, हसायला, प्रेरित व्हायला किंवा कृती करायला भाग पाडते? म्हणजेच प्रेक्षकांचं मानसशास्त्र समजून घेऊन त्यानुसार प्रभावी संवाद साधण्याची कला.
आज सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचं माध्यम राहिलेलं नाही. आज याच माध्यमातून अनेक जण स्वतःची ओळख निर्माण करत आहेत, स्वतःचा व्यवसाय वाढवत आहेत, हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि अर्थार्जनही करत आहेत.
तुम्ही शिक्षक असाल, डॉक्टर, समुपदेशक, उद्योजक, कलाकार, विद्यार्थी, प्रशिक्षक किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणारे असाल… आज स्वतःचं काम, विचार आणि कौशल्य प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंटेंट क्रिएशन हे अत्यंत महत्त्वाचं कौशल्य बनलं आहे.
मात्र केवळ व्हिडिओ शूट करणं म्हणजे कंटेंट क्रिएशन नाही. योग्य विषय निवडणं, स्क्रिप्ट लिहिणं, कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने बोलणं, प्रभावी शूटिंग, आकर्षक एडिटिंग आणि प्रेक्षकांशी जोडणारी सादरीकरणाची शैली शिकणं तितकंच आवश्यक आहे.
या कोर्समधून तुम्हाला काय शिकायला मिळेल?
प्रशिक्षक
सायली रणदिवे-जोशी
गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर ओरिजिनल आणि प्रभावी कंटेंट तयार करत लाखो प्रेक्षकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचलेल्या सायली रणदिवे-जोशी या अनुभवी कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया मेंटर आहेत. विविध नामांकित ब्रँड्ससोबत काम करण्याचा अनुभव तसेच कंटेंट स्ट्रॅटेजी, पर्सनल ब्रँडिंग आणि सोशल मीडिया ग्रोथ या विषयांवरील त्यांचे प्रत्यक्ष काम अनेक उद्योजक, व्यावसायिक आणि नवोदित क्रिएटर्सना प्रभावी कंटेंटद्वारे स्वतःची ओळख निर्माण करण्यास आणि उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण करण्यास प्रेरणा देते.
प्रसाद जोशी
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक विषयांवर माहितीपूर्ण कंटेंट तयार करत डिजिटल माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचलेले प्रसाद जोशी हे अनुभवी कंटेंट क्रिएटर आणि एज्युकेटर आहेत. ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे सहाय्यक प्राध्यापक असून NIT सुरत येथे पीएच.डी. संशोधक आहेत. YouTube आणि Instagramवरील त्यांच्या प्रभावी उपस्थितीद्वारे त्यांनी नॉलेज-बेस्ड कंटेंट, पर्सनल ब्रँडिंग आणि सोशल मीडिया ग्रोथमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आजचा काळ हा केवळ कंटेंट पाहणाऱ्यांचा नाही, तर प्रभावी कंटेंट तयार करणाऱ्यांचा आहे. योग्य ज्ञान, नियोजन आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या जोरावर कोणतीही व्यक्ती स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकते.
केवळ सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून स्वतःची ओळख, प्रभाव आणि अर्थार्जनाची संधी निर्माण करूया.
म्हणूनच स्कील इंडिया सहयोगी संवेदन गुरुकुल आयोजित २ महिन्यांचा मराठीतून लाईव्ह "कंटेंट क्रिएशन सर्टिफिकेट कोर्स" हा कंटेंट क्रिएशनची संपूर्ण प्रक्रिया—कल्पनेपासून प्रभावी सादरीकरणापर्यंत—व्यवहार्य, सोप्या आणि व्यावसायिक पद्धतीने शिकण्याची उत्तम संधी आहे.
महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब या उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.
Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.
Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.
Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.
Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat groups.
With the quizzes and live tests practice what you learned, and track your class performance.
Flaunt your skills with course certificates. You can showcase the certificates on LinkedIn with a click.