प्रभावी व्यक्तिमत्त्व, सूत्रसंचालन आणि संवाद कौशल्य सर्टिफिकेट कोर्स
Contact us

प्रभावी व्यक्तिमत्त्व, सूत्रसंचालन आणि संवाद कौशल्य सर्टिफिकेट कोर्स

सूत्रसंचालन, Public Speaking, Communication Skills आणि Interview Skills आत्मविश्वासाने शिकण्यासाठी मराठीतील प्रमाणपत्र कोर्स.

View all plans keyboard_arrow_up

₹6,000

₹10,000

Instructor: Dhanashree PradhanLanguage: Marathi

About the course

प्रभावी व्यक्तिमत्त्व, सूत्रसंचालन आणि संवाद कौशल्य सर्टिफिकेट कोर्स

प्रभावीपणे बोलणं ही एक कला असली तरी लोकांवर प्रभाव पाडणं हे महत्त्वाचं कौशल्य आहे, आणि याचा मुख्य पाया माणसाच्या वर्तनात व मानसशास्त्रामध्ये दडलेला आहे. आजच्या काळात फक्त चांगलं बोलता येणं पुरेसं नसून आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडणे, समोरच्या व्यक्तीला समजून घेणे आणि परिस्थितीनुसार संवादाची पद्धत बदलणे अत्यंत गरजेचे बनले आहे. माणूस स्वतःला कसा पाहतो, लोकांसमोर कसा मांडतो आणि त्याच्या वागण्याचा समोरच्यावर कसा परिणाम होतो, हा व्यक्तिमत्त्वाचा एक प्रमुख भाग आहे. आत्मविश्वास, विचारांची स्पष्टता, भावना, आवाज आणि देहबोली यांचा संवादावर होणारा परिणाम समजून घेतल्यास स्वतःला अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येते.

मंचावर बोलताना येणारी भीती (Stage Fear), संकोच, लोकांच्या परीक्षणाची (Judgment) भीती किंवा "आपण चुकलो तर?" हा विचार या सगळ्यामागे मानसशास्त्रीय घटक कार्यरत असतात. त्यामुळे Stage Fear, Self-confidence, Body Language आणि Emotional Intelligence यामागचं मानसशास्त्र समजून घेऊन स्वतःच्या संवादशैलीत आणि व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल करणे शक्य होते.

संवाद म्हणजे केवळ बोलणे नसून आपण काय बोलतो, कसे बोलतो, कोणत्या आवाजात बोलतो, किती ऐकतो आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांना किती समजून घेतो यावर त्याचा संपूर्ण परिणाम ठरतो. या सर्व कौशल्यांचा प्रत्यक्ष उपयोग सूत्रसंचालनात होत असल्याने, स्किल इंडिया सहयोगी संवेदन अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या या २ महिन्यांच्या सर्टिफिकेट कोर्समध्ये सूत्रसंचालन, व्यक्तिमत्त्व आणि संवाद कौशल्य यांचा एकत्रित अभ्यास मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून करून घेतला जाणार आहे.

मार्गदर्शिका

प्रशिक्षिका: धनश्री प्रधान दामले.

अनुभव: १५ वर्षांहून अधिक काळ शासकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, टीव्ही चॅनेल आणि सोशल मीडियावर निवेदक, मुलाखतकार व अभिनेत्री म्हणून प्रदीर्घ अनुभव.

अभ्यासक्रमातील मुख्य विषय

1. व्यक्तिमत्त्व व संवादाची पायाभरणी: Self-concept, आत्मविश्वास, विचार, भावना आणि देहबोलीचा संवादावरील परिणाम.

2. Stage Fear व Public Speaking चे मानसशास्त्र: मंचावरील भीती, judgment ची भीती आणि negative self-talk दूर करून आत्मविश्वास वाढवणे.

3. प्रभावी संवादाची मूलतत्त्वे: योग्य शब्दनिवड, Active Listening, आवाजातील चढ-उतार व गैर-शाब्दिक संवाद.

4. Transactional Analysis (TA): Parent, Adult आणि Child Ego States समजून घेऊन कुटुंब, कामाचे ठिकाण व सार्वजनिक संवादात त्याचा वापर.

5. Body Language व Stage Presence: Posture, eye contact, हावभाव व चेहऱ्यावरील भावांचा योग्य वापर.

6. सूत्रसंचालनाची कला: कार्यक्रमाची माहिती समजून घेणे, Anchoring Script तयार करणे, प्रभावी सुरुवात, पाहुण्यांची ओळख व समारोप.

7. मुलाखत व प्रश्न विचारण्याची कला: योग्य प्रश्न विचारणे, Active Listening आणि मुलाखत/पेनल चर्चा रंजक बनवणे.

8. Impromptu Speaking व प्रसंगावधान: विना-स्क्रिप्ट बोलणे, अचानक आलेले प्रश्न व तांत्रिक/अनपेक्षित अडचणी शांतपणे हाताळणे.

9. Social Skills व Emotional Intelligence: Self-awareness, empathy, भावनांचे नियंत्रण व नेटवर्किंग.

10. Assertive Communication: आपले मत ठामपणे मांडणे, "नाही" म्हणताना येणारा संकोच कमी करणे व स्वतःच्या मर्यादा जपणे.

11. Professional Communication: मीटिंग्स, मुलाखती व सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांचे मानसशास्त्र समजून संवाद साधणे.

12. व्यावसायिक वापर: Public Speaking, Interviewing, Training आणि Event Hosting मध्ये या कौशल्यांचा व्यावसायिक उपयोग.

तुमच्या व्यक्तिमत्त्वाला नवीन ओळख देण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि संवादाची कला आत्मसात करण्यासाठी हा कोर्स एक उत्तम संधी आहे. आजच आपली नोंदणी निश्चित करा आणि तुमच्या प्रभावी वक्तृत्वाच्या प्रवासाला सुरुवात करा.

Syllabus

Meet Sanvedan

Expand your knowledge with our expert-led courses. Join Sanvedan and dive into diverse subjects and linguistic richness. Enhance your academic foundation and immerse yourself in the beauty of languages. All levels welcome.

What do we offer

Live learning

Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.

Structured learning

Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.

Community & Networking

Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.

Learn with the best

Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat groups.

Practice tests

With the quizzes and live tests practice what you learned, and track your class performance.

Get certified

Flaunt your skills with course certificates. You can showcase the certificates on LinkedIn with a click.

Reviews and Testimonials