There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
ऑनलाइन मानसशास्त्र सर्टिफिकेट कोर्समध्ये सहभागी व्हा. मानवी मन, वर्तन, समुपदेशन तंत्रे आणि व्यावहारिक मानसशास्त्राचा अभ्यास करून प्रमाणपत्र मिळवा.
Instructor: Shridhar KulkarniLanguage: Marathi
"मला मानसशास्त्राची काय गरज? खरी गरज तर माझ्या नवऱ्याला, बायकोला, मुलाला किंवा ऑफिसमधल्या लोकांना आहे!" असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. पण थोडा विचार करून पाहा... किती वेळा आपल्याला एखादी व्यक्ती चुकीची वाटते, पण तिच्या वागण्यामागचं खरं कारण आपल्याला माहीत नसतं. कधी नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात, कधी मुलांना समजून घेणं कठीण जातं, कधी कामाच्या ठिकाणी संवाद बिघडतो, तर कधी आपणच आपल्या विचारांमध्ये, तणावात किंवा अतिविचारात अडकून जातो. याच ठिकाणी मानसशास्त्र आपल्याला नवी दृष्टी देते. मानसशास्त्र म्हणजे फक्त मानसिक आजारांचा अभ्यास नाही; तर मन, विचार, भावना, वर्तन, नाती समजून घेण्याचं आणि आनंदी जीवन जगण्याचं विज्ञान आहे. स्वतःला समजून घेण्यासाठी, इतरांना अधिक संवेदनशीलपणे समजून घेण्यासाठी आणि आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात अधिक प्रभावीपणे वागण्यासाठी मानसशास्त्राची साथ आज प्रत्येकालाच आवश्यक आहे.
या कोर्समधून तुम्हाला काय शिकायला मिळेल?
इतरांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, त्यांना समजून घेण्याची सुरुवात करूया. कारण जेव्हा माणूस समजतो, तेव्हा नाती बदलतात… निर्णय बदलतात… आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. म्हणूनच स्कील इंडिया सहयोगी संवेदन मानसशास्त्र अभ्यास केंद्र आयोजित २ महिन्यांचा मराठीतून लाईव्ह मानसशास्त्र सर्टिफिकेट कोर्स – A. हा मानसशास्त्राचा अभ्यास अगदी सोप्या, व्यवहार्य आणि वैज्ञानिक पद्धतीने शिकण्याची उत्तम संधी आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब या उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.
प्रशिक्षक
श्रीधर कुलकर्णी
गेली १४ वर्षे मानसोपचार आणि समुपदेशन क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेले समुपदेशकीय मानसशास्त्रज्ञ. एम.ए. (सायकोलॉजी) मध्ये शिक्षण. भावनिक ताणतणाव, नातेसंबंधातील अडचणी, कौटुंबिक प्रश्न आणि मानसिक समस्यांवर वेगवेगळ्या वयोगटात समुपदेशनाचा अनुभव. CBT, स्कूल कौन्सिलिंग, माईंडफुलनेस आधारित ताणतणाव व्यवस्थापन, तसेच विविध मानसशास्त्रीय परीक्षांचे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. डॉ.राजेंद्र बर्वे सरांबरोबर समुपदेशक म्हणून काम तसेच Medicines Sans Frontieres, Mpower, MDACS यांसारख्या नामांकित संस्थांसाठी काम केलेले अनुभवी प्रशिक्षक.
Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.
Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.
Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.
Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat groups.
With the quizzes and live tests practice what you learned, and track your class performance.
Flaunt your skills with course certificates. You can showcase the certificates on LinkedIn with a click.