Sleep Psychology Self-Paced Certificate Course
Contact us

Sleep Psychology Self-Paced Certificate Course

झोपेचं मानसशास्त्र समजा, मन आणि शरीराला द्या चांगल्या झोपेची साथ. Sleep, Mind & Emotions यांचा वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करा.

₹2,290

₹6,000

Instructor: Dr. Rajendra BarveLanguage: Marathi

About the course

झोपेचे मानसशास्त्र
Self-Paced Certificate Course

झोप म्हणजे फक्त विश्रांती नाही…
ती आपल्या शरीर, मेंदू, भावना आणि विचारांच्या आरोग्याशी जोडलेली प्रक्रिया आहे.

झोपेचं मानसशास्त्र, झोपेचे टप्पे, स्वप्नं, मन आणि झोप यांचा संबंध, झोपेच्या सवयी, जीवनशैली आणि Sleep Coaching या विषयांचा मानसशास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करा.

आता फक्त ₹2,290/- मध्ये

  • रात्र झाली की शरीर थकतं… पण मन मात्र शांत होत नाही?

संपूर्ण घर शांत झालंय, रस्त्यांवरची गर्दी थांबलीये, मोबाईलचे notifications देखील शांत झालेत… पण आपल्या मनात मात्र विचार सुरूच असतात. कोणी छताकडे बघत विचार करत पडलेलं असतं…कोणी उद्याच्या काळजीत हरवलेलं असतं…तर कोणी फक्त “झोप येत नाही” या असहाय्यतेत अडकलेलं असतं. हे असं का होतं? मानवी आयुष्यात सर्वात नैसर्गिक गोष्ट असूनही आपण सर्वात जास्त दुर्लक्ष करतो ती म्हणजे झोप.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सततचा स्क्रीन टाइम, कामाचा ताण, नात्यांमधील बदल, आर्थिक चिंता, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड आणि सतत काहीतरी मिळवण्याची धावपळ यामुळे मनाला शांत बसण्यासाठी जागाच उरलेली नाही.आणि जेव्हा मन शांत नसतं, तेव्हा झोपसुद्धा शांत राहत नाही. आपण अनेकदा म्हणतो…
“थोडी कमी झोप झाली तर काय होतं?”
“चार-पाच तास झोपलो तरी चालतं…”

पण मानसशास्त्र आणि विज्ञान सांगतं की झोप ही फक्त विश्रांती नसते.
झोप म्हणजे आपल्या शरीराची, मेंदूची, भावनांची आणि विचारांची पुनर्बांधणी करणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे.

  • WHY SLEEP PSYCHOLOGY?

झोप आणि मन यांचा संबंध समजून घेणं का महत्त्वाचं आहे?
आपण झोपलो की शरीर आणि मन पूर्णपणे बंद होत नाही. उलट, त्या काळात शरीर आणि मेंदू स्वतःला शांत आणि व्यवस्थित करण्याचं काम करत असतात. दिवसभराचा थकवा कमी करणं, मन शांत करणं, शरीराला पुन्हा ऊर्जा देणं आणि मेंदूला आराम मिळवून देणं — या महत्त्वाच्या गोष्टी झोपेमध्ये घडत असतात. चांगली झोप झाली की सकाळी मन हलकं वाटतं, कामात लक्ष जास्त लागतं, निर्णय शांतपणे घेता येतात आणि भावनिक स्थिरता टिकून राहण्यास मदत होते. पण जेव्हा झोप पूर्ण होत नाही किंवा शांत झोप लागत नाही, तेव्हा त्याचा परिणाम हळूहळू आपल्या दैनंदिन जीवनावर दिसू लागतो. चिडचिड वाढते, मन पटकन अस्वस्थ होतं, सतत विचार सुरू राहतात, एकाग्रता कमी होते, कामात उत्साह राहत नाही आणि व्यक्तीला आतून थकवा जाणवू शकतो.

मन शांत असेल तर झोप चांगली लागते आणि झोप चांगली झाली तर मन अधिक स्थिर राहण्यास मदत होते.
म्हणूनच Sleep Psychology — झोपेचे मानसशास्त्र हा विषय समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

 - या कोर्सची वैशिष्ट्ये

  • मराठीतून शिकण्याची संधी
  • Recorded Self-Paced Learning
  • तुमच्या सोयीनुसार अभ्यास
  • आवश्यकतेनुसार पुन्हा पुन्हा videos पाहण्याची सुविधा
  • मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विषयाचा अभ्यास
  • सविस्तर अभ्यासक्रम
  • प्रमाणपत्राची संधी

Sanvedan च्या सध्याच्या Self-Paced learning format मध्ये courses mobile तसेच laptop/desktop वर पाहता येतात आणि self-paced courses साठी lifetime access दिला जातो.

  • या कोर्सचे मार्गदर्शक

डॉ. राजेंद्र बर्वे
MD; DPM; FIPS
40+ Years Experience

सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे या उपक्रमाचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी श्रीलंकेत Mindfulness साधना करून “सुगत आचार्य” ही पदवी प्राप्त केली आहे. शेकडो articles च्या माध्यमातून मानसशास्त्र हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे. मानसशास्त्र विषयातील विविध पैलूंवर त्यांची ४७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या अनुभवातून आणि मानसशास्त्राच्या सखोल अभ्यासातून झोपेच्या मानसशास्त्राकडे वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची संधी या अभ्यासक्रमातून मिळते.

  • कोर्स पूर्ण करा आणि प्रमाणपत्र मिळवा

हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सहभागींसाठी Skill India Certificate उपलब्ध आहे.
मानसशास्त्र, Mental Wellness आणि Sleep Psychology या विषयातील तुमच्या learning journey ची नोंद म्हणून या प्रमाणपत्राचा उपयोग करता येईल.

  • अधिक माहितीसाठी संपर्क

📞 9975769371
📞 8767590355

Syllabus

Meet Sanvedan

Expand your knowledge with our expert-led courses. Join Sanvedan and dive into diverse subjects and linguistic richness. Enhance your academic foundation and immerse yourself in the beauty of languages. All levels welcome.

What do we offer

Live learning

Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.

Structured learning

Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.

Community & Networking

Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.

Learn with the best

Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat groups.

Practice tests

With the quizzes and live tests practice what you learned, and track your class performance.

Get certified

Flaunt your skills with course certificates. You can showcase the certificates on LinkedIn with a click.

Reviews and Testimonials