पटकथा लेखन आणि संवाद लेखन : एखादी गोष्ट प्रभावीपणे मांडण्याची कला!


"सकाळी ठीक ११ ची वेळ न्यायालयात निकाल सुनावला जाणार होता. आरोपीला शेवटचं काही बोलायचं आहे का, असं न्यायाधीशांनी विचारलं. तो शांतपणे उभा राहिला आणि म्हणाला, 'मला फाशी द्या... पण त्याआधी या न्यायालयात बसलेल्या एका व्यक्तीला अटक करा!'कोण आहे ती व्यक्ती? आरोपी असं का म्हणाला? या एका प्रसंगातून रहस्य, संघर्ष आणि अनेक अनपेक्षित वळणं असलेली कथा उभी राहू शकते. पण आता विचार करा,

हाच प्रसंग एखाद्या चित्रपटात दाखवायचा असेल तर तो कसा लिहाल? न्यायालयातील वातावरण, न्यायाधीशांचा प्रश्न, आरोपीच्या चेहऱ्यावरील भाव, त्याच्या बोलण्यातील ठामपणा आणि त्यानंतर न्यायालयात निर्माण होणारी शांतता... या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांसमोर कशा मांडाल?याचं एक उदाहरण पाहूया.

  • एका कथेचं पटकथेत रूपांतर कसं होतं?

दृश्य : न्यायालय – दिवस
न्यायालयात शांतता आहे. आरोपी पिंजऱ्यात उभा आहे. न्यायाधीश निकालाची कागदपत्रं तपासत आहेत. सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील आपापल्या जागेवर बसले आहेत. प्रेक्षकांमध्येही कमालीची शांतता आहे.
न्यायाधीश : आरोपीला शेवटचं काही सांगायचं आहे का?आरोपी काही क्षण शांत राहतो. तो हळूहळू न्यायाधीशांकडे पाहतो.
आरोपी : मला फाशी द्या, साहेब. पण त्याआधी या न्यायालयात बसलेल्या एका व्यक्तीला अटक करा!न्यायालयात कुजबुज सुरू होते. न्यायाधीश आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात.
न्यायाधीश : कोण आहे ती व्यक्ती? आणि तुम्ही असा आरोप का करत आहात? आरोपी न्यायालयातील मागच्या बाकाकडे बोट दाखवतो. कॅमेरा त्या दिशेने वळतो. तिथे बसलेली एक व्यक्ती अचानक अस्वस्थ होते.न्यायालयात एकच गोंधळ उडतो.
दृश्य समाप्त.
पाहा, एका छोट्या घटनेचं रूपांतर आपण एका दृश्यात केलं. मूळ कल्पनेत फक्त एक घटना होती. पण पटकथेमध्ये त्याचं दृश्यात्मक वर्णन, पात्रांची हालचाल, संवाद, वातावरण आणि प्रसंगातील तणाव यांची भर पडली.हीच पटकथा लेखनाची प्रक्रिया आहे. एखादी गोष्ट केवळ सांगण्याऐवजी ती प्रेक्षकांसमोर प्रत्यक्ष घडत असल्याचा अनुभव निर्माण करणं म्हणजे पटकथा लेखन!


  • पटकथा लेखन म्हणजे नेमकं काय?
एखादी गोष्ट सांगणं आणि ती गोष्ट पडद्यावर किंवा रंगमंचावर प्रभावीपणे उभी करणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गोष्टीमध्ये काय घडतं हे सांगितलं जातं, तर पटकथेमध्ये ते कसं घडतं, कोणत्या प्रसंगात घडतं आणि प्रेक्षकांना ते कसं दिसेल, याची सविस्तर मांडणी केली जाते.
पटकथा म्हणजे एखाद्या चित्रपटाची, नाटकाची किंवा मालिकेची संपूर्ण रचना. त्यामध्ये कथेची सुरुवात, पात्रांची ओळख, प्रसंगांची मांडणी, संघर्ष, उत्कंठा आणि शेवट या सगळ्यांचा विचार केला जातो.
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला अचानक समजतं की त्याचा जवळचा मित्र त्याच्यापासून एक मोठं सत्य लपवत आहे. ही घटना केवळ एका वाक्यात सांगता येईल. पण या घटनेमुळे निर्माण होणारा तणाव, दोघांमधील संवाद, चेहऱ्यावरील भाव आणि पुढे घडणाऱ्या घटना यांची प्रभावी मांडणी करणं, हे पटकथा लेखनाचं काम आहे.


  • चांगल्या पटकथेची वैशिष्ट्यं कोणती?

चांगली पटकथा केवळ मनोरंजन करत नाही, तर प्रेक्षकांना कथेचा एक भाग बनवते. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करावा लागतो.
१. रंजक कथानक : कथेची सुरुवात प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी असावी. पुढे काय होणार, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला पाहिजे.
२. प्रभावी पात्ररचना : प्रत्येक पात्राचा स्वभाव, विचार, बोलण्याची पद्धत आणि वागण्यामागची कारणं स्पष्ट असली पाहिजेत.
३. प्रसंगांची योग्य मांडणी : कोणता प्रसंग कुठे यावा, त्याची लांबी किती असावी आणि तो कथेच्या पुढील प्रवासाला कशी दिशा देईल, हे महत्त्वाचं असतं.
४. संघर्ष आणि उत्कंठा : कथेतील पात्रांसमोर काही आव्हानं किंवा अडचणी असतील, तर प्रेक्षकांची गुंतवणूक वाढते.


  • संवाद लेखन : पात्रांना बोलतं करण्याची कला!

पटकथा तयार झाली की त्यातील पात्रांना संवादांच्या माध्यमातून व्यक्त करण्याची वेळ येते. संवाद म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधील बोलणं नाही. पात्रांचे विचार, भावना, स्वभाव आणि नातेसंबंध व्यक्त करण्याचं ते एक प्रभावी माध्यम आहे.
चांगला संवाद तोच, जो कमी शब्दांत बरंच काही सांगून जातो.
उदाहरणार्थ,"
तू माझ्याशी खोटं का बोललास?"
आणि"खरं सांगितलं असतं, तर तू माझ्याशी बोलला असतास का?
"या दोन संवादांमधून केवळ प्रश्न आणि उत्तर व्यक्त होत नाही, तर दोन पात्रांमधील नात्यातील गुंतागुंतही जाणवते.
संवाद लेखन करताना पात्राचं वय, स्वभाव, सामाजिक पार्श्वभूमी, परिस्थिती आणि त्या क्षणी त्याच्या मनात सुरू असलेली घालमेल लक्षात घ्यावी लागते. प्रत्येक पात्राची बोलण्याची पद्धत वेगळी असली पाहिजे. अन्यथा सर्व पात्रं एकाच पद्धतीने बोलत असल्यासारखी वाटतात.


  • पटकथा आणि संवाद लेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

लेखनाची सुरुवात करण्यापूर्वी कथेचा मुख्य विचार स्पष्ट असणं आवश्यक आहे. आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे, कोणत्या प्रेक्षकांसाठी सांगायचं आहे आणि त्यातून कोणता अनुभव द्यायचा आहे, याचा विचार करावा.
त्यानंतर पात्रांची निर्मिती, त्यांच्यातील नातेसंबंध, कथेतील संघर्ष आणि प्रसंगांची क्रमवार मांडणी यावर काम करता येतं.
संवाद लिहिताना अनावश्यक शब्द टाळणं, नैसर्गिक भाषा वापरणं आणि प्रसंगाला साजेसे संवाद तयार करणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक भावना शब्दांतूनच व्यक्त केली पाहिजे असं नाही. कधी एखादी शांतता, थांबलेलं वाक्य किंवा छोटासा प्रतिसादही खूप काही सांगून जातो.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लेखनाचा नियमित सराव. चित्रपट, नाटकं आणि वेब सीरिज पाहताना त्यातील प्रसंगांची रचना, संवाद आणि पात्रांचा अभ्यास केल्यास लेखनाची समज अधिक विकसित होऊ शकते.


  • पटकथा आणि संवाद लेखन शिकण्याची संधी!

तुम्हालाही कथा सुचतात? एखादा चित्रपट किंवा नाटक पाहताना त्यातील प्रसंग कसे लिहिले असतील, संवाद कसे तयार केले असतील, असा विचार तुमच्या मनात येतो? किंवा स्वतःच्या कल्पनांना चित्रपट, नाटक अथवा वेब सीरिजच्या माध्यमातून व्यक्त करण्याची इच्छा आहे?
तर पटकथा लेखन आणि संवाद लेखन ही तुमच्यासाठी महत्त्वाची कौशल्यं ठरू शकतात. या क्षेत्रात केवळ कल्पनाशक्ती असून चालत नाही, तर लेखनाची तंत्रं, पटकथेची रचना, प्रसंगांची मांडणी, पात्रनिर्मिती आणि संवाद लेखन यांचं योग्य ज्ञान असणंही आवश्यक आहे.

याच उद्देशाने Sanvedan Psychology Study Centre घेऊन आले आहे पटकथा लेखन आणि संवाद लेखन Self-Paced Certificate Course. 
या कोर्सच्या माध्यमातून पटकथा लेखन आणि संवाद लेखन या विषयांची मूलभूत तत्त्वं आणि तंत्रं समजून घेण्याची संधी मिळते. एखादी कल्पना पटकथेच्या स्वरूपात कशी मांडायची, प्रसंगांची रचना कशी करायची, पात्रांची निर्मिती कशी करायची आणि प्रसंगाला साजेसे प्रभावी संवाद कसे लिहायचे, याविषयी शिकता येईल.
लेखनाची आवड असणारे, चित्रपट आणि नाटक या क्षेत्रात काम करू इच्छिणारे, कथा किंवा पटकथा लिहिण्याचा प्रयत्न करणारे तसेच आपल्या लेखनकौशल्याला अधिक चांगली दिशा देऊ इच्छिणारे लोक या कोर्सचा लाभ घेऊ शकतात.
हा Self-Paced Course असल्यामुळे तुम्हाला तुमच्या सोयीच्या वेळेनुसार रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून शिकता येईल. शिकण्याचा वेग तुम्ही स्वतः ठरवू शकता आणि आवश्यकतेनुसार पुन्हा व्हिडिओ पाहून विषय समजून घेऊ शकता.
प्रत्येकाच्या मनात एखादी तरी गोष्ट असते. काही गोष्टी अनुभवलेल्या असतात, काही कल्पनेतून जन्माला आलेल्या असतात. पण त्या गोष्टीला योग्य रचना, प्रभावी प्रसंग आणि लक्षात राहतील असे संवाद दिले, तर त्यातून एक उत्तम कलाकृती निर्माण होऊ शकते.

तुमच्या कल्पनांना पटकथेचं रूप द्या आणि तुमच्या शब्दांतून प्रेक्षकांपर्यंत एक वेगळी गोष्ट पोहोचवा!




Aniket Sathye

Sanvedan Gurukul